Skip to main content

Posts

Featured

लातूर लोकसभा निवडणूक २०१९

येत्या १८ एप्रिलला लातुरात लोकसभेसाठी मतदान होईल. सर्वांनी मतदान करावं यासाठी लातूर निवडणूक आयोगाने वरील कल्पक जाहिरात तयार केली आहे. निळी शाई लावलेलं मतदान केलेलं बोट, १८ एप्रिल तारीख, १८ आकड्याला दिलेले शेड्स आणि उजव्या-डाव्या बाजूला जाड व वरती-खालती कमी जाड निळी बॉर्डर इतक्याच मोजक्या ऐवजांनी लक्ष वेधून घेणारी ही जाहिरात शिवाजी चौकात जिल्हा परिषदेच्या व पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतनच्या आवारात लावलेली दिसते. जाहिरात बनवणाऱ्याचे कौतुक करायला हवे. मतदारांनी मतदान करावे हे सुचवणारी ही जाहिरात त्याच्या मिनिमल वापरामुळे आकर्षक झाली आहे. विचारी मतदाराला मतदानाची तारीख व मतदान करणे अनिवार्य आहे हा संदेश अचूकरीत्या मनात बिंबवण्याची हातोटी त्यात आहे.
इतकं असूनही मतदानाबद्दल एकूणच कंटाळवाणा सूर नेहमीच दिसून येतो. तो का याची चर्चा होणं गरजेचं आहे. त्याआधी काही आकडेवारी डोळ्यांखालून घालुयात. २०११ च्या जनगणनेनुसार लातूर शहराचं साक्षरतेचं प्रमाण ८४.22 टक्के आहे. त्यात ८८.९६ टक्के पुरूष व ७९.२० टक्के स्त्रिया आहेत. तरीही २०१४ च्या विधानसभाच्या निवडणुकीत फक्त २,०३,४४३ मतदारांनी मतदान केले आहे जे…

Latest Posts